Shambhuraj Desai, Sanjay Raut
Shambhuraj Desai, Sanjay RautSaam tv

Shambhuraj Desai : अजित पवार तुमच्यासाेबत आलेत? शंभूराज देसाई म्हणाले, पाेपटाची चिठ्ठी... (पाहा व्हिडिओ)

Sanjay Raut News : आता परिस्थिती बदललेली आहे असेही मंत्री देसाईंनी म्हटलं.
Published on

Shambhuraj Desai News : संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणार पोपट अशी टीका पुन्हा एकदा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. आम्ही लोकांची काम करीत आहाेत आणि यापुढं देखील करायची आहेत त्यामुळे सध्याच्या राजकीय घडमाेडींवर आम्ही नाराज नाही असेही देसाईंनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

Shambhuraj Desai, Sanjay Raut
Sharad Pawar In Karad: अरं... आपलं आबा हायेत आबा! आमदार काल अजितदादांसोबत, आज शरद पवारांसोबत कारमध्ये; कार्यकर्ते खूश

संजय राऊत (sanjay raut) यांना आता दुसर काही काम राहिलेलं नाही. रोज सकाळी उठून काहीतरी बोलत राहायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. आम्हाला लोकांच्यात राहायचं आहे. लोकांची काम करायची आहेत. संजय राऊत यांचं बोलणं तथ्यहीन असते. त्याला कोणताही आधार नसतो. संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे. आता तुम्ही गांभीर्याने घेत जाऊ नका असे मंत्री देसाईंनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले.

Shambhuraj Desai, Sanjay Raut
Pune News : वाहनधारकांनाे ! चार जूलैपासून 'या' वेळेत चांदणी चौकातील वाहतुक मार्गात बदल; जाणून घ्या कारण

सध्याच्या (satara) राजकीय घडामाेडीवर मंत्री देसाई (shambhuraj desai) म्हणाले आमचे नेते शिंदे साहेबांनी जाे निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे. आमचे सर्व आमदार 100 टक्के खुश आहेत. कोणीही आमदार नाराज नाही. ते आमच्याकडे आलेले आहेत, परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे अजिबात नाराजी नाही. आम्हाला शिंदे साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे असे ठामपणे मंत्री देसाईंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com