youth, arrests, amravati Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Crime News : एटीएममधून पैसे चाेरणारी टाेळी अटकेत, अमरावती पाेलिसांची कामगिरी

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

Amravati News : अमरावती शहरात एटीएम मधून पैसे पळविणारी टोळी सक्रिय असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आल आहे. रात्रीच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग दरम्यान तिघा संशयित पोलिसांना पकडल्याची माहिती नवीनचंद रेड्डी (पोलीस आयुक्त) यांनी दिली. (Maharashtra News)

अमरावतीच्या उस्माना मस्जिद परिसरात आयसीआयसीआय बँकेचे (bank) एटीएम आहे. या ठिकाणी एका लोखंडी पट्टीच्या साह्याने ग्राहकांचे पैसे पळविण्याचा प्रकार केला जात असे. अगदी सहजरीत्या चोरटे एटीएम मधून पैसे काढत होते. २० ते २५ वर्ष वयोगटातील तीन आरोपींनी हा एटीएम मधून पैसे पळविण्याचा नवा प्रकार केला.

अनेकदा बँकेच्या एटीएम मध्ये पैसे नसल्यास, त्यातून पैसे निघत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना संशय सुद्धा येत नाही. आपण केलेल्या ट्रांजेक्शनचे पैसे चोरटे पळवू शकतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन आंतरराज्य तीन आरोपींनी डाव साधण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या (police) सतर्कतेने सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT