chhatrapati sambhaji nagar, adarsh nagari sahakari patsanstha aurangabad, ambadas mankape saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Adarsh Scam : 'आदर्श' चे अध्यक्ष अंबादास मानकापे अटकेत

पतसंस्थेच्या दारावर बसून ठेवीदारांना पैशासाठी विनंती करावी लागत आहे.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या 200 कोटींच्या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यास पोलिसांनी अटक केली. दरम्यान या घाेटाळ्यामुळे चिंतेत असलेल्या ठेवीदांरापैकी एका ठेवीदाराने आज त्यांचे जीवन संपविल्याची घटना जिल्ह्यातून समाेर आली आहे.(Maharashtra News)

आदर्श नागरी पतसंस्थेच्या संचालकांवर वेगवेगळ्या संस्थांच्या आणि जवळच्या व्यक्तीच्या नावावर कर्ज लाटून 200 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या आदर्श पतसंस्थेमध्ये मजुरी करणारे कामगार, शेतकरी, नोकरदार या सगळ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे पतसंस्थेमध्ये ठेवले आहेत. मात्र त्यांच्याच पैशावर संचालकांनीच डल्ला मारल्याचा प्रकार झाला आहे.

आता आपले पैसे परत मिळावे म्हणून पतसंस्थेच्या दारावर बसून ठेवीदारांना विनंती करावी लागत आहे. मानकापे यास अटक झाल्यानंतर पोलिस पुढची काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT