Beed: वडझरी पॅटर्नचा आणखी एका मोहरक्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: वडझरी पॅटर्नचा आणखी एका मोहरक्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बोगस आरोग्य भरती प्रकरणात बीडमधून आतापर्यंत 9 जणांना अटक

विनोद जिरे

बीड: राज्यभर (State) गाजत असणाऱ्या वडझरी पॅटर्नची (Wadzari pattern) पोलखोल, पुणे (Pune) सायबर पोलिस (Cyber ​​Police) करत आहेत. बोगस आरोग्य भरती प्रकरणात, (Health Recruitment Case) बीडमधील (Beed) आणखी एका वडझरी पॅटर्नच्या मोहरक्याला पुणे सायबर पोलिसांनी बेड्या (arrested) ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे सायबर पोलिसांना हवा असलेला हा मोहरक्या अखेर पोलीसांच्या हाती लागला आहे. (Police arrested another accused in Wadzari pattern)

हे देखील पहा-

अतुल प्रभाकर राख रा.थेरला ह.मु. अंकुशनगर बीड, असे अटक केलेल्या आरोपी मोहरक्याचे नाव आहे. अतुल राख हा अगोदर अटकेत (arrested) असणाऱ्या, आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याचे सर्व बोगस कामाचे रॅकेट अतुल राख चालवत होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून पुणे सायबर पोलीस त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. अखेर काल त्याच्या पुण्यातुनचं पोलीसांनी मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या आहेत.

आरोग्य भरतीतील गट 'क' आणि गट 'ड' या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. यातील केवळ संजय शाहुराव सानप हा पोलीसांनी जेरबंद केलेला आहे. तर अतुल राख याच्या मुसक्या आवळल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान बोगस आरोग्य भरती प्रकरणात आतापर्यंत बीड जिल्ह्यतील ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अद्याप अनेक रॅकेट चालवणारे मोहरे खुलेआम फिरत असून त्यांना देखील अटक करावी, अशी मागणी बीडकरांमधून होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

Maharashtra Live News Update: चंद्रकांत पाटील उद्या पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार, कायदा व सुव्यवस्थेच्याबाबत घेणार आढावा

Ladki Bahin Yojana: दीड कोटी लाडक्या अपात्र ठरणार? केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच e-KYC पूर्ण

SCROLL FOR NEXT