Akola News जयेश गावंडे
महाराष्ट्र

लाखों रुपयांच्या गुटख्यावर पोलिसांची कारवाई; मुख्य आरोपी फरार

सदर वाहन आणि गुटखा साठा हिवरखेड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून जप्त मुद्देमालाची किंमत कळू शकली नाही.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - अकोल्यातील अकोटच्या पोलिस उपअधीक्षक रितू खोकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून हिवरखेड पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झरी येथे धडाकेबाज कारवाई करीत झरी येथून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठा, सुगंधित तंबाखू, पान मसाला इत्यादी जप्त केला आहे. सदर साठा सातपुडा पर्वत क्षेत्रातुन मेळघाट मार्गे मध्यप्रदेशातून आणून झरी हिवरखेड इत्यादी परिसरात त्याची विक्री करण्याच्या बेताने आणला गेला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

रितू खोकर यांच्या पथकाने वाहनास अडविले असता वाहन चालक व सहकारी वाहन सोडून पसार झाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आरोपीचे नाव कळू शकले नाही. सदर वाहन आणि गुटखा साठा हिवरखेड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून जप्त मुद्देमालाची किंमत कळू शकली नाही.

परंतु सदर मुद्देमाल लक्षवधीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. उपरोक्त कार्यवाही पोलीस उपअधीक्षक रितू खोखर, शे.नासिर, विलास साबे, अंकुश कल्याणकर, इत्यादींनी केली. परंतु घटनास्थळावरून आरोपी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता त्या मुख्य आरोपींना अटक होते की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर ते मुंबई विमानसेवा होणार सुरू

Maulana Controversy : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य; कार्यकर्त्यांनी मौलानाला स्टुडिओमध्ये चोपलं, VIDEO व्हायरल

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT