सोशल मीडियावर भाईगिरीचे रील्स बनवणारे तरुण पोलिसांच्या तावडीत.
राजकीय गुन्हेगार आणि गावगुंडांनाही अटक
या कारवाईनंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून चर्चेत.
नाशिकमधील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी गावगुंडांसोबतच राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत नाशिक पोलिसांनी गुंडांना सळो की पळो करून सोडलंय. तर सोशल मीडियावर दादागिरी, भाईगिरीचे रिल्स तयार करणारे देखील यावेळी पोलिसांच्या तावडीतून सुटलेले नाहीत. पोलिसांच्या या कारवाईची चर्चा का होतेय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
ऐकलं हे तरुण नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, या मंत्राचा जप करताना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मात्र हा जप करण्यामागचं कारण आहे. भाईगिरीचे रील्स. ही एकच रील्स नाही, तर नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये तर थेट रील्समधून हत्येचीच भाषा करण्यात आलीय. एवढंच नाही तर नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीचे रॅप ही व्हायरल झालेत.
खरंतर नाशिकमध्ये हत्या, खंडणी, अपहरण करणाऱ्या टोळ्यांसोबतच सोशल मीडियावर भाईगिरीच्या रील्स बनवणाऱ्यांना दणका देण्यासाठी पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवलीय.. आणि त्यातच नामचीन गुंडांची गुंडगिरी आणि रील्स बनवणाऱ्यांची भाईगिरी मोडीत काढत त्यांना गुडघ्यावर आणलंय.
खरंतर नाशिकमधील वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी फक्त रील्स स्टारच नाही तर भाजप, शिंदेसेना, आरपीआय या पक्षातील राजकीय गुंडांच्याही मुसक्या आवळल्यात. एवढंच नव्हे तर जिथं दहशत माजवली तिथंच त्यांची धिंड काढलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.