PM Narendra Modi Speech Washim:  Saamtv
महाराष्ट्र

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

PM Narendra Modi Speech Washim: बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या "बंजारा विरासत संग्रहालयाचे" पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते यावेळी उपस्थित होते.

Gangappa Pujari

सूरज मसूरकर, प्रतिनिधी

PM Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पोहरादेवी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित केला गेला. तसेच बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या "बंजारा विरासत संग्रहालयाचे" पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी राज्यात डबल इंजिनचे सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले, तसेच काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"मी पोहरदेवीला प्रणाम करतो.आज नवरात्रीत मला मातेचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. मी सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. १९०० कोटी शेतकर्यांना आतापर्यंत दिले गेले आहेत. पोहरादेवीच्या आशीर्वादाने लाडकी बहिण योजनेचे पैसे देण्याची संधी मिळाली. मला आज लोकार्पणाची संधी मिळाली.तुम्ही जायच्या आधी बंजारा विरासत संग्रालय बघून जा," असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

"मी फडणवीसांचे अभिनंदन करतो. त्यांच्या सरकारच्या काळात याची सुरवात झाली. जिसको किसीने नही पुछा उसे मोदी पुजता हे बंजारा समाजाने भारताच्या निर्मितीत मोठा वाटा उचलला आहे. देशासाठी या समाजातील महापुरुषांनी काय नाही केले. आपले जीवन देशासाठी समर्पित केले.बंजारा समाजात अनेक संत होऊन गेले. ज्यांनी ऊर्जा दिली," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा या विकास कामाला सुरवात झाली. पण मध्ये एक सरकार आले आणि त्यांनी काम थांबवले. पुन्हा आमचं सरकार आले आणि काम झाले. काँग्रेस गरिबाला अजून गरिब करत आहेत. आपल्याला काँग्रेसपासून सावध रहायला हवं. काँग्रेस आपल्याला एकमेकांध्ये लढवू पहात आहे. पण आपली एकता देशाला वाचवणार आहे. दिल्लीत हजारो कोटीचे ड्रग्ज पकडले गेले. त्याचा सूत्रधार काँग्रेसचा नेता. काँग्रेस युवकांना नशेची लत लावत आहे व त्या पैश्याचा वापर निवडणुकीत करायचा आहे," असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT