PM Narendra Modi Solapur Visit Saamtv
महाराष्ट्र

PM Modi Speech: 'तुमचं स्वप्न, माझा संकल्प आहे, भारत जगातील टॉप ३ अर्थव्यवस्थेत येणार...' PM मोदींनी आणखी एक गॅरंटी दिली

PM Narendra Modi Solapur Visit: २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. तेव्हा आपले भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराघरात रामज्योती लावा, असे आवाहनही सोलापूरवासियांना केले.

विश्वभूषण लिमये

PM Modi Speech:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पुर्ण होण्याची गॅरंटी, असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.

घराघरात रामज्योती लावा...

"पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमस्कार करीत आहे. ही वेळ आपल्या सर्वांसाठी भक्तीभावानं भरलेली आहे. २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. तेव्हा आपले भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत," असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घराघरात रामज्योती लावा, असे आवाहनही सोलापूरवासियांना केले.

महाराष्ट्राची प्रगती होतेयं..

"मी सोलापूरवासियांना महाराष्ट्रवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी आता मुख्यमंत्र्यांना ऐकत होतो. ते म्हणाले की मोदींच्यामुळे महाराष्ट्राचा गौरव वाढत आहे. शिंदेजी, हे ऐकून चांगलं वाटतं. नेत्यांना तर अधिक चांगलं वाटतं. खरं हे आहे की महाराष्ट्राचं नाव रोशन होतंय ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि प्रगतीशील सरकारमुळे होतेय," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोधकांवर निशाणा..

"देशातील २५ कोटी लोकांनी गरिबीला पराभूत केलं हे मोठं यश आहे. देशाच्या गरिबांना सुविधा दिल्या. साधने दिली. त्यांची चिंता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वात मोठी चिंता दोन वेळची भाकरी...आमच्या सरकारने गरिबांना मोफत रेशन देऊन चिंतामुक्त केलं. अर्धी रोटी देण्याच्या घोषणा दिल्या नाहीत," असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

SCROLL FOR NEXT