PM Narendra Modi Saam Digital
महाराष्ट्र

PM Narendra Modi: भारतातील तरुणांना परदेशात ४० लाख नोकरीच्या संधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रोजगाराबाबत मोठं वक्तव्य

Skill Development Program: राज्यातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PM Narendra Modi

अनेक देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण जगात आज कौशल्यवान तरुणांची मागणी आहे. जगातील जवळपास १६ देश ४० लाख कौशल्यवान तरुणांना नोकरी देण्यासाठी इच्छुक असून भारतातील तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. त्यामुळे कौशल्य विकासावर अधिक भर देण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज राज्यातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचं उदघाटन करून बोलत होते.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधांनी तरुणांना मार्गदर्शन केलं.

सुख आणि यशाची प्राप्ती, शिक्षण आणि कौशल्य यातून मिळतं. तरुणांचं हे स्वप्न प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी आजची प्रभात ही मंगलमय प्रभात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. तसेच अनेक देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काम करणारे हात कमी पडतायेत. असे देश क्रयशक्तीसाठी इतर देशांवर अवलंबून आहेत. भारत हा तरुणांचा देश म्हणून जगभरात ओळखला जातो. त्यामुळे भारताकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. जवळपास १६ देशांमध्ये ४० लाख नोकरीच्या संधी आहेत आणि भारतातल्या तरुणांना या संधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन, नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिलं. बांधकाम क्षेत्र, आरोग्य, पर्यटनासारख्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. तसेच महाराष्ट्रात मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात तरुणांसाठी अनेक संधी आहेत. त्यामुळे सॉफ्ट स्किलवरही भर द्या, असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा २६ ऑक्टोबरला शिर्डी दौरा

पंतप्रधान २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते साई संस्थानने भाविकांसाठी बांधलेली एसी दर्शन रांग , शैक्षणिक संकुल , निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण तसेच शिर्डी विमानतळ नवीन इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्प केवळ श्रीमंतांसाठी, निव्वळ पोकळ दावे; प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: कराडजवळील उंब्रज येथील गणेश धाब्याजवळ माल वाहतूक ट्रक पेटला

अभिनेत्री ऊर्फी जावेदने मुस्लिम धर्म सोडला? आता कोणता धर्माचं पालन करतेय? VIDEO

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला, भाजपच्या मंत्र्याची राजधानीत घोषणा

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT