Kolhapur News
Kolhapur NewsSaam Digital

Kolhapur News: दूध उत्पादकांसाठी खुशखबर: गोकुळकडून १०१ कोटी बोनस जाहीर

Kolhapur News: दूध उत्पादकांना बोनस जाहीर करण्यात आला असून दूध संस्थाच्या खात्यावर फरकाची 101 कोटी 34 लाख रुपये रक्कम जमा होणार आहे
Published on

Kolhapur News

कोल्हापूर दूध उत्पादक संघ गोकुळतर्फे दूध उत्पादकांना दिवाळीची भेट देण्यात आली आहे . दूध उत्पादकांना बोनस जाहीर करण्यात आला असून दूध संस्थाच्या खात्यावर फरकाची 101 कोटी 34 लाख रुपये रक्कम जमा होणार आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीला अंतिम दूधदर फरक दिला जातो. त्यानुसार दूध संस्थाच्या खात्यावर फरकाची 101 कोटी 34 लाख रुपये रक्कम जमा होणार आहे. म्हैस दूधाला सरासरी प्रतिलिटर 2 रुपये 80 पैसे तर गायीच्या दुधाला प्रतिलिटर 1 रुपये 80 पैसे फरक देण्यात आला आहे.

यावर्षी बऱ्याच भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा अन्नधान्याच्या सरासरी उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गोकुळ दूधसंघाने शंभर कोटीहून अधिक बोनस जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Kolhapur News
Kolhapur News: कोल्हापुरात कोहळा मिळवण्यासाठी पोलीस, भाविकांमध्ये धक्काबुक्की, प्रचंड गोंधळ

पावसावरची शेती आता बिनभरवश्याची होत चालली आहे. कधी पावसाची अनियमितता तर कधी अतिवृष्टी. यावर्षी तर पावसाळ्यातील सर्वच दिवस शेतकऱ्याची नजर आकाशाकडे लागलेली होती. अशा परिस्थितीत दूध व्यवसायाकडे शेतकरी आशेने पाहताना दिसत आहे. केवळ शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात. त्यात योग्य दर नसल्यामुळे दूध व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, मागील एक दोन वर्षात दुधाला चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळले आहेत.

Kolhapur News
Nanded Morcha News : पगार थकविल्याने कंत्राटी सफाई कामगारांचा नांदेड महापालिकेवर माेर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com