PM Modi Namaste To Rahul Gandhi 
महाराष्ट्र

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

PM Modi Rahul Gandhi Maharashtra Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधीही आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आज दोन्ही नेत्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

Gangappa Pujari

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. त्याआधी महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राज्यात महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असतानाच दिल्लीमधील पक्षश्रेष्ठींचेही राज्यात दौरे वाढल्याचे दिसत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधीही आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आज दोन्ही नेत्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम जिल्ह्याच्या दौ-यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पोहरादेवी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित केला जाणार असून, यामुळे देशातील सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यासह सुमारे 56,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्यात कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते 23,300 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे.

ज्यामध्ये देशी गायीच्या संगोपणासाठी युनिफाइड जीनोमिक चिप लाँच" केली जाणार आहे. तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या "बंजारा विरासत संग्रहालयाचे" पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वाशिमनंतर पंतप्रधान मोदी ठाण्याकडे रवाना होतील. ठाण्यात 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्टेशनवरून बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

राहुल गांधी कोल्हापुरात..

दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विमानामध्ये बिघाड झाल्याने त्यांचा शुक्रवारचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता ते कोल्हापुरात दाखल होतील. राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यानंतर ते शाहू समाधीस्थळी अभिवादन करतील. विधानसभेच्या आधी राहुल गांधी यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT