Raj Thackeray On Hanuman Jayanti 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Hanuman Jayanti 2024: 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून 'नवसंजीवनी' मिळू दे.. राज ठाकरेंचं मारुतीरायाला साकडं

Raj Thackeray On Hanuman Jayanti 2024: पंतप्रधान मोदींसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरुन हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Gangappa Pujari

मुंबई|ता. २३ एप्रिल २०२४

आज २३ एप्रिल. प्रभू श्रीरामांचे परमभक्त, पवनपुत्र हनुमानांचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती. देशभरात हनुमानजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरुन हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणालेत राज ठाकरे?

"निष्ठेचा महामेरू बजरंगा... माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला 'नवसंजीवनी' मिळू दे... आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!," असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मारुतीरायाला साकडं घातलं आहे.

पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा..

देशभरातील माझ्या परिवाराला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. पवनपुत्र हनुमानांचे समर्पण सर्व राम भक्तांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या कृपेने विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा मिळावी हीच माझी सदिच्छा, जय बजरंगली, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

राज्यभरात उत्साह..

दरम्यान, आज सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरातील विविध हनुमान मंदिरात आज पहाटेपासून भाविकांची मारुतरायांच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे. ठिकठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यात येत आहे. जय हनुमान, रामभक्त हनुमानकी जयच्या जयघोषाने पहाटेपासून मंदिर परिसर दुमदुमुन गेला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT