Rahul Gandhi: अन्नातून विषबाधेनंतर राहुल गांधी पुन्हा सक्रिय; अमरावती, सोलापुरात उडवणार प्रचाराचा धुरळा

Rahul Gandhi Sabha In Amravati And Solapur: अन्नातून विषबाधेनंतर राहुल गांधी पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. अमरावती आणि सोलापुरात उद्या राहुल गांधी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam Tv

सुनील काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूका पार पडल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. राज्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातील दिग्गज नेते उतरल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये २६ एप्रिल तर अमरावतीमध्ये ७ एप्रिल रोजी मतदान होणार (Maharashtra Election) आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उद्या २४ एप्रिल रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करणार (Rahul Gandhi Sabha In Amravati And Solapur) आहेत. अन्नातून विषबाधेनंतर राहुल गांधी पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय.

काँग्रेसच्या सोलापूर (Solapur) लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. सोलापुरातील मरीआई चौकातील एक्झिबिशन मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या सभास्थळाची पाहणी केली (Rahul Gandhi Sabha)आहे. सोलापूर लोकसभा निवडणूकीतून वंचितच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे आता आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध आमदार राम सातपुते यांच्या थेट लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं (Congress Leader Rahul Gandhi) आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Speech : राहुल गांधींची मोठी घोषणा; महिलांच्या खात्यात महिन्याला जमा करणार 8500 रुपये

अमरावती (Amravati) लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधीची जाहीर सभा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये हे मतदान होणार आहेत. अमरावती महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यात लढत होणार (Maharashtra Politics) आहे. आता राहुल गांधी स्वत: बळवंत वानखेडे यांच्य प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. राज्यात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेलं दिसत आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: 'सूरत'वरून धुरळा! राहुल गांधी संतापले; म्हणाले, संविधान संपवण्याच्या दिशेने एक पाऊल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com