PM Modi Photo On Fertilizer Bag Saam Tv
महाराष्ट्र

PM Narendra Modi: खतांच्या बॅगवर मोदींचा फोटो; वाशिममध्ये आचारसंहितेचा भंग? समनक जनता पार्टीकडून तक्रार

PM Modi Photo On Fertilizer Bag: लोकसभा निवडणूकीच्या तारखा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु वाशिम जिल्ह्यात मोदींचा फोटो असलेल्या खतांच्या बॅगची विक्री केली जात आहे.

Rohini Gudaghe

मनोज जयस्वाल, साम टीव्ही वाशिम

Code Of Conduct Lok Sabha Election 2024

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यापासून निकाल लागेपर्यंत आचारसंहिता असणार आहे. परंतु वाशिम जिल्ह्यात मोदींचा फोटो (PM Narendra Modi) असलेल्या खतांच्या बॅगची विक्री केली जात आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप केला जात आहे.  (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झालेली असतांना वाशिम जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या डीएपी आणि युरिया खतांच्या बॅगची विक्री केली जात आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची (PM Modi Photo On Fertilizer Bag) तक्रार समनक जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केली आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत सरकारकडून डीएपी आणि युरिया खतावर शेतकऱ्यांना सबसिडी दिली जातेय. या योजनेला सरकारकडून प्रधानमंत्री भारतीय जण उर्वरक परियोजना असं नाव देण्यात आलं आहे. यातून भाजप असं नाव निर्देशित (Lok Sabha Election 2024) होतंय. या खताच्या बॅग वर नरेंद्र मोदींचा फोटोही छापण्यात आलेला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील वातावरण तापलेलं आहे.

आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही राजकी नेत्यांचे फोटो, पक्षाचं चिन्ह, सरकारच्या योजनांची जाहिरात देखील करता येत (Lok Sabha 2024) नाही. मात्र, आता या खतांच्या बॅगमुळे भाजपचा प्रचार होत असल्याचा आरोप समनक जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तारखा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु वाशिम जिल्ह्यात मोदींचा फोटो असलेल्या खतांच्या बॅगची विक्री केली जात आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत (Code Of Conduct Lok Sabha Election) नाहीत. निवडणुकीच्या प्रचारात कोणतेही सरकारी वाहन, कर्मचाऱ्यांचा वापर करण्यास बंदी असते. धार्मिक स्थळांचा वापर प्रचारासाठी करता येत नाही, परवानगीशिवाय दुकान, घर, जमीन किंवा आवारात बॅनर आणि पोस्टर्स लावता येत नाहीत. निवडणुकीचा प्रचार करताना सभेसाठी (Code Of Conduct) किंवा रॅली काढण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. कोणत्याही योजनेचं उद्घाटन किंवा अंमलबजावणी देखील करता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT