Sanjay Raut  Saam Tv
महाराष्ट्र

मोदी - शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; बड्या खासदारानं बॉम्ब फोडला, सप्टेंबर महिन्यात राजकीय भूकंप होणार?

PM Modi and Amit Shah Meet President: दिल्लीत राष्ट्रपती मुर्मू यांची मोदी आणि अमित शहा यांनी भेट घेतली. संजय राऊत यांनी सप्टेंबर महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडींचा इशारा दिला.

Bhagyashree Kamble

  • दिल्लीत राष्ट्रपती मुर्मू यांची मोदी आणि अमित शहा यांनी भेट घेतली

  • संजय राऊत यांनी सप्टेंबर महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडींचा इशारा दिला

  • पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये महत्वाच्या बैठका

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक आणि त्या संदर्भातही संभाव्य घडामोडी

दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू असताना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. लागोपाठ झालेल्या भेटीमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या भेटी आणि चर्चांवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

भेट आणि महत्वाच्या बैठकांवर संजय राऊत म्हणाले, 'देशात राष्ट्रपतींचे काय अधिकार आहेत? हे आपल्याला ठाऊक आहे. राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार सरकार किती काम करतं? हे पण आपल्याला ठाऊक आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची बैठक आहे. माझ्या माहितीप्रमाणे या बैठकीतही भविष्यातील महत्वाच्या घडामोडींवर चर्चा होऊ शकते', असं राऊत म्हणाले.

यावेळी राऊतांनी मोठा दावा केला आहे. 'सप्टेंबर महिन्यांत राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडणार आहे. या देशात सप्टेंबर महिन्यात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात', असाही दावा त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान भेटणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. ते राष्ट्रपरतींना भेटायला जातात हेच महत्वाचे आहे. सध्या एकंदरीत कामाची परिस्थिती पाहता, काहीही घडू शकते. पुढे काय घडतंय ते पाहू', असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Care : दैनंदिन आहारात दही-ताक कधी घ्यावं? तज्ज्ञांचा हा सल्ला नक्की वाचा

Eco-Friendly Ganpati: गाईच्या शेणापासून गणेश मूर्ती, शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम, वर्षाला मिळतोय २ लाखांचा नफा | VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा , ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

MHADA Homes: म्हाडाच्या घरांची आता लॉटरीशिवाय विक्री! पण कुठे? वाचा का घेतला निर्णय

Period delay pills: मासिक पाळी पुढे ढकलण्याचा गोळ्या जीवघेण्या ठरू शकतात का? तज्ज्ञांनी सांगितलं, कसा वाढतो ब्लड क्लॉटचा धोका

SCROLL FOR NEXT