PM Kisan samman nidhi yojana 17th installment date Saam Tv
महाराष्ट्र

PM Kisan Yojana : पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी खुशखबर;'या' तारखेला खात्यात जमा होणार 2000 रुपये

PM kisan Yojana 17th installment : ऐन पेरणीचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या १७ व्या हप्त्याची तारीख ठरली आहे.

Satish Daud

निवडणुकीची धामधूम संपली असून आचारसंहिता शिथील झाली आहे. पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी बळीराजाला पैशांची चणचण भासत आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

या पैशांमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत होणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पीएम किसान योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली आहे.

या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी तीन ६००० रुपयांची मदत केली जाते. प्रत्येकी २००० अशा तीन टप्प्यात पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. योजनेचा मागील म्हणजेच १६ वा हप्ता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

त्यानंतर जवळपास ४ महिन्यांचा कालावधी लोटला, तरी १७ वा हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे आता पुढील हप्त्याचे पैसे कधी मिळणार? याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला.

पेरणीचा हंगाम तोंडावर असताना पंतप्रधानांनी १७ वा हप्ता जारी करण्यासाठी फाईल पास केली. आता या हप्त्याचे पैसे लवकरच खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, २५ जूनपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील. ज्यामुळे पेरणीला मोठी मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

Shocking News : मुलीच्या शाळेची फी आणि TC मागायला गेले, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण; वडिलांचा जागीच मृत्यू

Monsoon Skin Tips: पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या? जाणून घ्या घरच्या घरी वापरता येणारे प्रभावी उपाय

Maharashtra Live News Update : साई दरबारी तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Hidden Maharashtra Waterfall : महाराष्ट्रातले हे Top 8 धबधबे विकेंड प्लॅनसाठी ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT