Crop Insurance Saam Tv
महाराष्ट्र

Crop Insurance: रब्बी हंगामातील पिक विमा काढलाय का? अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास

PM Crop Insurance scheme: रब्बी हंगामातील पिक विमा काढण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामात विमा काढला जातो.राज्यातील जवळपास ४१ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यातील २९ लाख ४० हजार ६८ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला आहे. (PM Crop Insurance Scheme)

या योजनेत गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी विमा घेण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर तर भारत आणि भूईमुगसाठी विमा काढण्याची मुदत ३१ मार्च आहे. (PM Insurance Scheme Application Last Date)

राज्यात मागील वर्षी हर १ रुपयात पीक विमा उपलब्ध करुन दिला होता. यंदाही शेतकरी १ रुपयात विमा घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४१ लाख ९ हजार ६९४ अर्ज दाखल केलेत.त्यातील सर्वाधिक अर्ज हे लातूरमधील शेतकऱ्यांनी केले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजी नगरमधून ३६ हजार १२८ अर्ज आले आहेत. कोकणातून सर्वाधिक कमी म्हणजे ६१ अर्ज दाखल केले आहेत.या योजनेत तुम्ही रविवार म्हणजे उद्यापर्यंत अर्ज करु शकतात.

आतापर्यंत आलेल्या अर्जातील २९ लाख ४० हजार ६८ हेक्टर जागेसाठी विमा संरक्षित केला आहे. तर यासाठी १२ हजार ३२८ कोटी ६७ लाख रुपयांची रक्कम संरक्षित केली आहे. या योजनेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरु अर्ज करायचा आहे.या हप्त्यासाठी राज्य सरकारला ७५१ कोटी ८३ लाख रुपये तर केंद्र सरकारला ४४७ कोटी ३६ लाख रुपये द्यावे लागणार आहे.एकूण १ २२९ कोटी ६१ लाख रुपये खर्च सरकार करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narali Purnima: नारळी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? ९९% लोकांना माहिती नसेल

Ind vs Eng : नाइट वॉचमन म्हणून आला अन् इंग्लंडला धुतलं; फिफ्टी ठोकताच आकाश दीपची मैदानावरील Reaction Viral

Rupees 2000 Note: 2000 नोटांबाबत मोठी अपडेट; अजूनही 6017 कोटी रुपयांच्या नोटा चलनात

नालासोपारा मनीलॉन्ड्री प्रकरणात ED ची मोठी कारवाई, ८ कोटींची रोकड आणि दागिने जप्त, नगररचना उपसंचालक अडचणीत|VIDEO

Maharashtra Live News Update : - शिवसेनेला चेकमेट देणारा तयार झालेला नाही - भरत गोगावले

SCROLL FOR NEXT