माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर | साम टीव्ही
अभिजीत दिपकेच्या वडिलांचे उत्पन्न आणि संपत्तीची चौकशी करावी, अशी तक्रार सूरतच्या एका आरआटीआय कार्यकर्त्यानं महाराष्ट्र सरकार आणि अनेक अधिकाऱ्यांकडे केली होती. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या मुलाचे अमेरिकेत शिक्षण कसे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्यावर अभिजीत दिपके संतापला. मी बोस्टनचा खर्च कसा घेऊ शकलो अशी ती तक्रार आहे. मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचे लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची पदवी आहे, ती दाखवावी. सार्वजनिक करावी. त्यांनी पदवी सार्वजनिक केली तर मी माझे स्कॉलरशिप आणि एज्युकेशन लोन लेटर दाखवायला किंवा सार्वजनिक करायला तयार आहे, असे दिपके म्हणाले.
घरापर्यंतच काय तर जी चौकशी करायची आहे, ती करून घ्या. मी काय पहिली व्यक्ती नाही, ज्याच्यासोबत हे होत आहे. या देशात आपण जेव्हा सरकारच्या विरोधात बोलतो, जेव्हा प्रश्न उपस्थित करतो, त्यावेळी ते पहिली गोष्ट हीच करतात. ईडी, सीबीआय पाठवणे सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी, सीबीआय पाठवा, असं आव्हान दिपकेंनी दिलं आहे.
मी माझं एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. मी माझं स्कॉलरशिपचं लेटर दाखवायला तयार आहे. ईडीला पाठवत असाल तर त्यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी त्यांची डिग्रीही पाठवावी. तुम्ही तुमची डिग्री सार्वजनिक करा, मी माझी डिग्री सार्वजनिक करतो, असेही दिपके म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.