Nandurbar, Water Scarcity saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : दुष्काळात तेरावा महिना... आधीच पाणीपुरवठ्यात कपात त्यात जलवाहिनी फुटली; नंदुरबारकर चिंतेत

आधीच वीरचक धरणात पाणीसाठा कमी आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार शहरातील जेके पार्क परिसरात पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे. नंदुरबार शहर आणि परिसरात दमदार पाऊस पडत नसल्याने आधीच पाण्याचे संकट आले आहे. त्यात जलवाहिनी फुटल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी पालिकेवर वेळ आली आहे. (Maharashtra News)

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात ४० टक्के पाणीसाठा (virchak dam water level) असल्याने नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहेत. आज नंदुरबार शहरातील जेके पार्क या परिसरात पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे.

शहरात अधीच पाणी टंचाई निर्माण होणार आहे तर त्यातच पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेला आहे. परंतु काही काळानंतर पालिका प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू केलं होतं. परंतु मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेला आहे.

त्यामुळे पालिके प्रशासनाने वाया जाणाऱ्या पाण्यावरती लक्ष देणे गरजेचे झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. यासाठी पालिका प्रशासनाने या गोष्टींकडे आता लक्ष देणे गरजेचे असल्याचे शहरातील नागरिक म्हणत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT