Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : मित्रांनीच केला घात; विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर, त्या दिवशी नेमके काय घडले

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या केली होती. घटनेचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक माहिती मिळाली

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारीला घडली होती. या घटनेत आता एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली असून सोबत शिकणाऱ्या मित्रांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली होती. पैशांची सातत्याने मागणी केली जात असल्याने घाबरून विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याने संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या केली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक माहिती मिळाली आहे. महाविद्यालयात सोबत शिक्षण घेणाऱ्या ५ ते ६ मित्रांनी त्यांच्याच सोबत शिकणाऱ्या एका मित्राला ग्रींडर गे ऍप वर बनावट अकाउंट वरून संपर्क साधला आणि त्याला रूम वर बोलाऊन घेतले. 

व्हिडीओ करत ब्लॅकमेलिंग 

यानंतर त्याचे आणि अन्य एका व्यक्तीचे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्या मित्राला सेक्सटॉर्शनच्या रकमेसाठी ब्लॅकमेल करायला सुरवात केली. यात त्यांनी ५० हजार रुपये नाही दिले; तर संबंधित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. या सगळ्या प्रकाराने मयत विद्यार्थी घाबरला आणि त्याने पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन वरील पुलावरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

तिघांना घेतले ताब्यात 

दरम्यान घटनेत मृत पावलेल्या मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका नातेवाईकाकडे ५० हजार देण्याची मागणी केली होती. ते पैसे तो कुणाला देणार होता? याचा शोध घेत असतांना हा गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी ३ संशयित आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली असून इतर जणांचा शोध घेत आहेत. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी विद्यार्थ्यांच्या टोळक्याने अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना देखील ब्लॅकमेल केल असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने तपास सुरू केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: आनंदावर विरजन! लग्नाला जाताना समृद्धी महामार्गावर कार उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,अपघातापूर्वीचा VIDEO समोर

आचारसंहिता लागली! ३१ डिसेंबरची पार्टी करण्यापूर्वी नक्की वाचा, अन्यथा मद्यपींना होणार अटक, वाचा नियम काय सांगतो

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Liver Damage: काय सांगता खरं की काय! त्वचेवर काळे डाग आणि लिव्हरचा काही संबंध आहे का? 5 गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात

Peru Benefits: हिवाळ्यात पेरू का खातात, त्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT