Pimpri chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला पुन्हा धक्का; शहर उपाध्यक्षांनी दिला राजीनामा

Pimpri chinchwad : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्ते, पदाधिकारींना जबाबदारी सोपविली जात आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुक लागण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहरात भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे. शहरातील भारतीय जनता पक्षाचे वाकड परिसरातील माजी नगरसेवक तसेच शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) अनुषंगाने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्ते, पदाधिकारींना जबाबदारी सोपविली जात आहे. अशात पक्षातील प्रमुख पदाधिकारी बाहेर पडत असल्याने भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीला वैतागून भाजपचे वाकड परिसरातील माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी देखील आपलय पदाचा राजीनामा तीन दिवसांपुर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला होता. त्यात त्यांनी आणखी दहा-पंधरा नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं दावा केला होता. 

दरम्यान संदीप कस्पटे यांनी केलेल्या दाव्यानुसार राम वाकडकर यांनी देखील आपला पदाचा राजीनामा आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविला आहे. राम वाकडकर हे वाकड परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे एक मोठे दमदार नगरसेवक आणि उद्योजक आहेत. त्यांनी भाजपला राम राम ठोकल्यामुळे चिंचवड विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT