Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : ज्वेलर्सच्या दुकानात शस्त्रासह दरोडा टाकण्याचा प्रयत्न; रावण टोळीतील ९ जण पोलिसांच्या ताब्यात

Pimpri Chinchwad News : दोन गाड्या भरून ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या टोळीबाबत पोलिसांनी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचत टोळीला ताब्यात घेतले आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : ज्वेलर्सच्या दुकानात धारदार शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एक टोळी फिरस्ती करत होती. दुकानात घुसून दरोडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न फसला असून यात कुख्यात रावण टोळीतील नऊ गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड शहराच्या गुंडा विरोधी पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून शस्त्र व बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.  

पिंपरी चिंचवड शहर परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका ज्वेलरी दुकानात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात हि टोळी होती. रावण टोळीतील आरोपी चार चाकी वाहनात बसून अग्निशस्त्र आणि धारदार शस्त्रासह चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील पाटील नगर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये दरोडा घालण्यासाठी जात होते. याबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तीन अल्पवयीन मुलांचा समावेश 

या टोळीत असलेले अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव, अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार, यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे, शुभम गोरखनाथ चव्हाण, प्रद्युम्न राजकुमार जवळगे, सोहन राजू चंदेलिया या सहा आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी तीन अल्पवयीन बाल गुन्हेगारांना ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपी विरोधात चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता, आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यानुसार गुन्हा केला आहे. 

गाड्यांसह साहित्य जप्त 

पोलिसांनी या टोळीची चौकशी करत गाड्यांची तपासणी केली. या टोळीतील सहा सज्ञान आरोपींना तसेच तीन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी देशी पिस्टल, काडतूसे, मिरची फूड पावडर, लोखंडी कोयता, गुप्ती रस्सी आणि दोन चारचाकी वाहनांसोबत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: थंडीने गाल रखरखीत झालेत? मग त्वचा मुलायम होण्यासाठी आजच हे ३ घरगुती उपाय वापरून पाहा

ओलिस प्रकरणाआधी रोहित आर्यचा विद्यार्थ्यांसोबतचा ‘ऑडिशन’ व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे प्राधान्य

Saturday Horoscope: अडचणी दूर करण्याची ताकद मिळणार, या राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT