पिंपरी चिंचवड : नागरिकांना हेरून बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास लावून अनेकांची (Pimpri Chinchwad) लुबाडणूक झाल्याचे प्रकार समोर आले होते. अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयाची (Fraud) फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. (Tajya Batmya)
पिंपरी चिंचवड शहर परिसरात शेअर ट्रेडिंग अँपच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडत फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले होते. याबाबत पोलिसात तक्रार दाखल होती. यामुळे पोलीस फसवणूक करणाऱ्याच्या मागावर असताना पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले आहे. यामध्ये जुनेद मुक्तार कुरेशी, सलमान मन्सूर शेख, अब्दुल अजीज अन्सारी, आकिफ अन्वर आरिफ अन्वर खान, आणि तोफिक गफ्फार शेख असे ह्या शेअर मार्केट फॉड ट्रेडिंग टोळीतील आरोपीचे नाव आहेत. या पाचही आरोपींनी मिळून जवळपास १२० बँक अकाउंटसच्या (Pimpri Chinchwad Police) माध्यमातून नागरिकांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आल आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुद्देमाल केला हस्तगत
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या टोळीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर सेलने ७ लाख रुपये रोख रक्कम, ७ मोबाईल फोन, १ कॅश काउंटिंग मशीन, वेगवेगळ्या बँकेच्या ८ डेबिट कार्ड, १२ वेगवेगळ्या बँकेची चेक बुक्स आणि पंजाब नॅशनल बँकेचे १ पासबुक असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.