Beed News : अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई; २५ मोटारी केल्या जप्त, ग्रामस्थांचा तहसीलदारांना घेराव

Beed News : बीड जिल्ह्यात गतवर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई आहे. यामुळे जिथे पाणी उपलब्ध होईल तिथून उपसा करण्याचे धोरण ग्रामस्थांनी अवलंबले आहे
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : यंदा पाणी टंचाई जाणवत असल्याने तलाव, धरणातील पाणी साठा जपून वापरला जात आहे. मात्र बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील महातपुरी या गावात गोदापात्रातून अवैध पाणी उपसा केला जात असल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत मोटारी देखील जप्त केल्या आहेत. (Live Marathi News)

Beed News
Hingoli Unseasonal Rain : गारपिटीच्या तडाख्यात शेतकऱ्याचा मृत्यू; हिंगोलीत फळबागा उद्धवस्त, अमरावतीत दोन बैलांचा मृत्यू

बीड जिल्ह्यात गतवर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई (Water Scarcity) आहे. यामुळे जिथे पाणी उपलब्ध होईल तिथून उपसा करण्याचे धोरण ग्रामस्थांनी अवलंबले आहे. अशात (Majalgaon) माजलगाव तालुक्यातील महातपुरी गावात गोदावरी नदीतून पाणी उपसा केला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीवरून अवैध पाणी उपसा थांबवण्यासाठी तहसीलदारांनी सकाळीच त्या ठिकाणी भेट दिली. या पात्रात असलेल्या विद्युत मोटार काढून त्यांचे वायर देखील तोडण्यात आले होते. या ठिकाणी २५ विद्युत पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Election Duty : निवडणूक कामासाठी चक्क मृत कर्मचाऱ्यांची नावे; मराठवाडा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

मोटार जप्ती केल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी तहसीलदारांची गाडी अडवली. तसेच आमच्या गुरांच्या पाण्यासाठी आम्ही हे पाणी उपसा करतोय. आमच्या मोटार जशाच्या तशा जोडून द्या, अशी मागणी केली. दरम्यान याविषयीची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रकाश सोळुंके यांनी भेट देत ग्रामस्थांची समजूत घातली. तसेच यातून आपण लवकरच मार्ग काढू; असे आश्वासन देखील दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com