Election Duty : निवडणूक कामासाठी चक्क मृत कर्मचाऱ्यांची नावे; मराठवाडा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग व स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे. या निवडणूक कामासाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.
Marathwada University
Marathwada UniversitySaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुक आता काही दिवस राहिले आहेत. यामुळे प्रशासन गतिमान झाले आहे. निवडणूक (election) कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या कामासाठी चक्क मृत (Sambhajinagar) कर्मचाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्याचा प्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली आहे. (Breaking Marathi News)

Marathwada University
Ahmednagar News : महाराष्ट्रातील या गावात हनुमंताचे नावही घ्यायला घाबरतात; जिथे होते फक्त दैत्याची पूजा

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) निवडणूक आयोग व स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे. या निवडणूक कामासाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. त्यानुसार निवडणुकीच्या कामासाठी जिल्हा निवडणूक विभागाने विविध कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांची यादी मागितली होती. यामध्ये (Marathwada University) विद्यापीठ प्रशासनाने निवडणूक विभागाला कर्मचाऱ्यांची जी यादी पाठविली, त्यामध्ये काही मृत कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Marathwada University
Hingoli Unseasonal Rain : गारपिटीच्या तडाख्यात शेतकऱ्याचा मृत्यू; हिंगोलीत फळबागा उद्धवस्त, अमरावतीत दोन बैलांचा मृत्यू

मात्र हा प्रकार निवडणूक विभागाला लक्षात येताच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे खुलासा मागवला होता. विद्यापीठ प्रशासनाने खुलासा सादर केला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा खुलासा अमान्य करत नावे पाठविणाऱ्या अधिकारी कर्मचारी विरोधात मोघम नव्हे तर थेट कारवाई करून अहवाल सादर करा. अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com