Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime: कंपन्यांमध्ये चोरी करणारे ताब्यात; २४ लाखाचा मुद्देमाल जप्त

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक वसाहत परिसरात या टोळीकडून दिघी, चिखली, चाकण, कोंढवा आणि भारती पोलिस स्टेशन हद्दीतील आठ चोरीचे गुन्हे चिखली पोलिसांनी उघडकीस आणले

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक परिसरांमधील कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी धारदार शस्त्रासह घुसून चोरी केला जात असल्याचा प्रकार घडत होते. चोरी करणाऱ्या या टोळीला पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Breaking Marathi News)

पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक वसाहत परिसरात या टोळीकडून दिघी, चिखली, चाकण, कोंढवा आणि भारती पोलिस स्टेशन हद्दीतील आठ चोरीचे गुन्हे चिखली पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. अब्दुल कलाम रहिमान शहा, योगेश तानाजी चांदणे, रविशंकर महावीर चौरसिया, रिजवान खान, शकील मंसुरी आणि दोन विधी संघर्ष बालकांचा या टोळीत समावेश आहे. अब्दुलकलाम रहिमान शहा, योगेश तानाजी चांदणे आणि रविशंकर महावीर चौरसिया ह्या तिन आरोपींना चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर उर्वरित आरोपीचा शोध चिखली पोलिस अजुनही घेत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२४ लाखाचा मुद्देमाल जप्त 

सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून चिखली पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून चिखली पोलिसांनी २४ लाख ४५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ग्राइंडर मशीन, पोपट पाना, चार्जेबल ट्यूबलाईट, ब्युटेन गॅसगन, लोखंडी छिन्नी, कुऱ्हाडीचे पाते, ड्रिल मशीन, स्टील बोल्ड कटर, हेक्सा फ्रेम, टि पाना, स्क्रू ड्राइवर आणि हातोडा अस चोरीसाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT