Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : भोसरीतील कंपनीला २ कोटीचा गंडा; गुजरातमधून एकाला घेतले ताब्यात

Pimpri Chinchwad News : कंपनीचा डायरेक्टर बोलतो असं भासवून बनावट व्हाट्सअप नंबरच्या साह्याने तिघांनी मिळून कंपनी अकाउंटटला AI सॉफ्टवेअर सोल्युशन या अकाउंवर १ कोटी ९५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास लावले

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला तब्बल १ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी सायबर पोलिसात दाखल तक्रारीवरून गंडा घालणाऱ्याचा शोध सुरु करण्यात आला होता. दरम्यान कंपनीला गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी जेनीलाल वसंतभाई वाघेला (वय २२) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जेनीलाल वाघेला याने प्रिन्स विनोदभाई पटेल व नकुल खिमाने या आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीशी संपर्क साधला. कंपनीचा डायरेक्टर बोलतो असं भासवून बनावट व्हाट्सअप नंबरच्या साह्याने या तिघांनी मिळून कंपनीच्या अकाउंटटला AI सॉफ्टवेअर सोल्युशन या अकाउंवर १ कोटी ९५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास लावले होते.

दोघा साथीदारांचा शोध सुरु 

या प्रकारातून कंपनीची १ कोटी ९५ लाख रुपयाचा आर्थिक गंडा घातल्याचे समजताच कंपनीकडून सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला सुरवात करत हे तिघे गुजरातमधील असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक गुजरातमध्ये जाऊन जेनीलाल वाघेला यास ताब्यात घेतले. दरम्यान त्याचे दोन साथीदार फरार आहे. त्यांचा शोध सुरु आहे. 

दोन तरुणांकडून एमडी ड्रग्स जप्त 

नाकाबंदी दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील चाकण पोलिसांनी दोन तरुणांकडून ७.९० ग्रॅम एमडी ड्रग्स हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात चाकण पोलिसांनी फिरोज अहमद फेमुल्ला खान (वय ३३) आणि जमील अहमद वासिस अली (वय ३४, मुळ रा. उत्तर प्रदेश) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही आरोपींनी मिळून पिंपरी चौक येथे राहणारा निखिल राजू सरोदे या ड्रग्स पेडलरकडून ड्रग्स विकत आणल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT