ajit pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवार गटात नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार?

Ajit Pawar News update : पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. या नाराजीनाट्यावरून बडा नेता नाराज असल्याची माहिती हाती आली आहे.

Akshay Badve

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग

दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू

एकीकजे युतीची चर्चा, दुसरीकडे अजित पवार गटात नाराजीनाट्य

महापालिका निवडणुकीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे,पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. यावरून अजित पवार गटात नाराजीनाट्य सुरू झालं आहे. यामुळे अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडमधील बडा नेता नाराज असून राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झालं आहे. पिंपरी-चिंचवडचे शहर अध्यक्ष योगेश बहल नाराज असल्याचं समोर आलं आहे. नाराजीनाट्यामुळे योगेश बहल राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांचे पत्ते होणार कट होणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून शहराध्यक्ष योगेश बहल, विलास लांडे, अजित गव्हाणे, अण्णा बनसोडे, नाना काटे यांची अजित पवारांची बैठक निष्फळ ठरल्याचं बोललं जात आहे.

पिंपरीतील जागावाटपावरून झालेली ३ तासांची बैठक निष्पळ ठरल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास सुलक्षणा शिलवंत यांच्यासाठी जितेंद्र ननावरे यांचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे.

पुण्यात ठाकरे गटाला धक्का

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना कंटाळून पुण्यात सेनेचे शहर समन्वयक जावेद खान आणि शिवसेनेचे सूरज लोखंडे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केलाय. वारिष्ठांना फक्त राज्यात मुंबई महापालिका एकच आहे, असे वाटत म्हणून ते बाकीकडे लक्ष देत नाहीय. उद्धव ठाकरे अजूनही कार्यकर्त्यांना विचारात घेत नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: रॉडनं मारलं, नंतर सुनेचा हात कापला; सासरा आणि पती म्हणाले, 'अधिकारी किंवा नेते कोणीही आमचं काही करू शकत नाही...'

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची ताज हॉटेलमध्ये बैठक

Trendy Hairstyle: पार्टी, फंक्शनसाठी साडीवर करा 'या' ट्रेंडी आणि सुंदर हेअरस्टाईल

Accident News: रंगरंगोटीचे काम करून जेवणाला बसले अन्...; भरधाव कारनं २० मजुरांना चिरडलं, २ जणांचा मृत्यू

निवडणुकीनंतर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रकृती अस्वस्थ; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT