dombivli news  Saam tv
महाराष्ट्र

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

dombivli news : डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्यात आली आहे.

Saam Tv

श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराबाबत महत्वाची अपडेट समोर

मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

भाजप नेत्यांनी दिली महत्वाची माहिती

डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी महायुती सरकारने ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर केली आहे. यामुळे मंदिरभूमीचा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लावल्याप्रित्यर्थ पिंपळेश्वर महादेव भक्तांसहित स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांनी मंदिरात पूजन केलं. त्यांनी सपत्नीक संकल्पपूर्ती पूजन केलं.

ऐतिहासिक निर्णयाच्या निमित्ताने ८ जून २०२६ रोजी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात भव्य शिवोत्सव, भजन-कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व नेते श्री पिंपळेश्वर महादेवांचे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.

'महायुती सरकारमुळेच विविध खात्यांशी संबंधित मंदिरभूमीसाठी आवश्यक निर्णयांची अंमलबजावणी केली. त्यामुळे दोन दशकांचा संघर्षात अखेर यश प्राप्त झालं. हा क्षण हजारो शिवभक्त, ग्रामस्थ आणि डोंबिवलीकरांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा आहे, असे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

तत्पूर्वी, मंदिरभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन दशके पाठपुरावा करण्यात आला होता. मंदिरभूमीसाठी ग्रामस्थ सभा, शासकीय बैठका, कायदेशीर लढा आणि लोकआंदोलनांच्या उभारण्यात आले होते. त्यानंतर हा विषय शासन दरबारी मांडण्यात आला होता. २० ऑगस्ट २०१२ रोजी भाजपने या आंदोलनाला बळ देण्यासाठी डोंबिवली बंदची हाकही दिली होती. या सर्व संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. आता मंदिरभूमीची मालकी देवस्थानकडे हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

'मंदिर हा असंख्य शिवभक्तांच्या श्रद्धेचा विषय असून मंदिराला हक्काची जागा मिळावी. तसेच भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत. भगवान महादेवाची कृपा आणि जनतेच्या पाठबळामुळे हा संघर्ष यशस्वी झालाय. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि समाजातील सुख, समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना करण्याच्या भावनेतून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे," असेही रविंद्र चव्हाणांनी सांगित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT