Satara Politics News Saamtv
महाराष्ट्र

Satara Politics: 'खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार गोरेंचे पीए...' रामराजे नाईक निंबाळकरांचे टीकास्त्र

Phaltan News: "माझ्यावर वारंवार बारामतीला पाणी दिल्याचा आरोप करतात पण बारामतीला पाणी दिलं असतं तर तुमच्या विडणी गावचा ऊस वाढला असता का?" असा थेट सवालही रामराजेंनी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना विचारला.

ओंकार कदम

Satara Politics News:

सातारच्या राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यातील वाद काही नवा नाही. एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांचे नाव घेतले जाते. सध्या माढा लोकसभेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच पुन्हा एकदा रामराजे निंबाळकरांनी जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले राजराजे नाईक निंबाळकर?

साताऱ्यातील (Satara) फलटण मतदारसंघात महायुतीतील वादाला सुरुवात झाली आहे. विडणी येथे झालेल्या एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी भाजप खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आमदार जयकुमार गोरेंचे (Jaykumar Gore) पीए आहेत, अशी खोचक टीका रामराजेंनी केली.

रणजितसिंह निंबाळकर गोरेंचे पीए..

"हे इथे नाही पनवेलला असतात, गुरू बोराटवाडीला. हे सर्व तिथून चालतं. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन आणि बोराटवाडीतून सर्व चालतं. आजपर्यंत देशातला एकही खासदार बघितला नाही, जो आमदारांच्या मागे बसतो. आपले खासदार आमदारांचे पीए आहेत," असे राजराजे नाईक निंबाळकर यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"परवाच्या सभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) माझे मित्र आहेत म्हणून आले मात्र ते आमदार जयकुमार गोरेंना बघवलं नाही. माझ्यावर वारंवार बारामतीला पाणी दिल्याचा आरोप करतात पण बारामतीला पाणी दिलं असतं तर तुमच्या विडणी गावचा ऊस वाढला असता का?" असा थेट सवालही रामराजेंनी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना विचारला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पावसामुळे झेंडू फुलांची आवक घटली, दर मात्र वाढले

Trending Blouse Designs For Women: दसऱ्यानिमित्त महिलांनी करा खास पारंपारिक पोशाख, हे आहेत ट्रेंडी ब्लाऊजचे पॅटर्न्स

DA Hike: महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढेल? असं असेल कॅल्क्युलेशन

Thursday Horoscope: वाईट काळ संपला ! दसऱ्यापासून ‘या’ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Consumer Awareness : नियम पाळले नाहीत, कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी; अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT