petrol diesel tanker drivers strike in manmad saam tv news
महाराष्ट्र

Petrol Diesel Tanker Drivers Strike News : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात इंधनाचा तुटवडा भासणार? टॅंकर चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरु

अचानक पुकारलेल्या संपामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News :

रस्ते आपघाताबाबत सरकारच्या जाचक व अन्यायकारक कायद्याच्या (New Hit And Run Law) निषेधार्थ इंधन पूरवठा वाहन चालकांनी आजपासून (बुधवार) पुन्हा संप पुकारल्याचे चित्र मनमान येथे दिसत आहे. मनमाड येथील पेट्रोलियम प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी आता स्टेअरिंग छोडो आंदोलन छेडले आहे. परिणामी सकाळपासून एकही इंधनाचा टॅंकर प्रकल्पातून बाहेर पडलेला नाही. (Maharashtra News)

काही दिवसांपूर्वी नवीन हिट अँड रन कायदाच्या विराेधात राज्यभरात ट्रक चालकांतून संताप व्यक्त केला गेला. हा नवा हिट अँड रन काळा कायदा आहे. हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी वाहतुकदारांनी केली. त्यावेळी सरकारने कायद्याची अमलबजावणी तूर्तास करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर वाहतुकदारांनी संप मागे घेतला.

आता पुन्हा हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मनमाडच्या भारत पेट्रोलियम , हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातील इंधन वाहतुक टँकर चालकांनी आज रात्री 12 वाजल्यापासून स्टेअरिंग छोडो आंदोलन छेडले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनमाडच्या इंधन प्रकल्पात आज सकाळपासून चालक फिरकलेले नाहीत. सकाळपासून एकही इंधन टँकर बाहेर पडलेला नाही. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून इंधन पुरवठा ठप्प झाला आहे.

यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधन तुडवडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपाबाबत अथवा आंदाेलनाबाबत एकाही वाहतूक संघटनेने अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान अचानक पुकारलेल्या संपामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT