Maharashtra Petrol Diesel Price Saam Tv
महाराष्ट्र

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेलच्या किंमती वाढणार? कर्नाटकात इंधनाच्या दरात 3 रुपयांनी वाढ

Maharashtra Petrol Diesel Price: शेजारील राज्य कर्नाटकात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर राज्यातही इंधनाच्या दरात वाढ होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Satish Kengar

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार आहे का? असा प्रश्न राज्यातील अनेक नागरीकांना पडला आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू झाली आहे.

कर्नाटक सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर लादलेल्या विक्रीकरात केलेल्या बदलामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ झाली असून, याची किंमत आता 99.84 रुपयांवरून 102.84 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.02 रुपयांची वाढ झाली असून आता याची किंमत 85.93 रुपयांवरून 88.95 रुपयांवर पोहोचली आहे.

यावरून भाजपने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले, 'काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. काँग्रेस म्हणते की, देशात महागाई आहे आणि मग त्यांची राज्य सरकारे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू लागतात. कर्नाटकात त्यांनी शेतकरी विरोधी आणि सामान्य माणूस विरोधी आदेश, फतवा, जिझिया कर पारित केला आहे. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 3 रुपये आणि 3.05 रुपयांची वाढ केली आहे.''

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

एकीकडे कर्नाटक सरकारने इंधनाच्या किंमतीत वाढ केली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. यातच आज देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 87.62 रुपये प्रतिलिटर राहिले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या प्रमुख तेल विपणन कंपनीच्या वेबसाइटवर ही आकडेवारी देण्यात आली आहे.

राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?

दरम्यान, शेजारील राज्य कर्नाटकात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर राज्यातही इंधनाच्या दरात वाढ होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. राज्यात अलीकडेच लोकसभा निवडणूक पार पडली. ज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. यातच आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्यात इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यात कमी आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT