Truck Drivers Strike Saam Digital
महाराष्ट्र

Truck Driver Strike: पंपांवर रांगा, भाजीपाला महागला; घरगुती गॅसही मिळेना; ट्रक चालकांच्या संपामुळे जनजीवन विस्कळित, काय होतोय परिणाम?

Gangappa Pujari

Truck Driver Strike:

देशभरात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाची झळ सर्व सामान्यांना बसताना दिसत आहे. ट्रक चालकांच्या संपामुळे भाजीपाल्याचा, इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपाबाहेर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या संपामुळे रुग्णवाहिका, स्कूल बसेस, दैनंदिन बससेवाही विस्कळीत झाली आहे.

पंपावर वाहनांच्या रांगा...

हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरात पेट्रोल डिझेल टँकर चालकांनी तीन दिवसाचा संप पुकारला आहे. या संपाचा सर्वाधिक फटका इंधन विक्रीवर होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. विविध शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

भाजीपाला महागला...

ट्रक चालकांच्या संपाचा काहीसा फटका एपीएमसी भाजीपाला मार्केट वर झालेला पहायला मिळतोय. एपीएमसी बाजारात परराज्यातील माल आला नसून राज्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात झाली आहे. भाजीपाल्याची आवक पन्नास टक्क्यांनी घसरली असून ग्राहक देखील घटल्याने भाजीपाल्याला उठाव नाही.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बससेवेवर परिणाम...

पेट्रोल आणि डिझेल वाहतूक दारांच्या संपाचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील एस टी च्या 8 आगारांमध्ये आजचा दिवस पुरेल इतकाच डिझेल साठा शिल्लक आहे. रायगडमध्ये 8 आगारांना दिवभरात 32 हजार लिटर डिझेलची गरज असते. सध्या तरी संपाचा एस टी वर परिणाम नसला तरी उद्या पर्यंत संप मिटला नाही तर एस टी सेवा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

घरगुती गॅसचा तुटवडा..

दरम्यान, या ट्रक चालकांच्या या थेट गृहिणींच्या स्वयंपाकासाही फटका बसल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात दिसत आहे. बुलढाण्यात एलपीजी गॅसचा पुरवठा धणज आणि मनमाड येथून केला जातो. गॅस सिलेंडर संपल्यामुळे गॅस एजन्सी चालकांनी दोन दिवसांपूर्वीच आपले ट्रक गॅस रिफील सेंटरकडे पाठवले होते. मात्र आजचा तिसरा दिवस उजाडल्याने हे ट्रक गॅस सिलेंडर भरून परत न आल्याने आता शहरी आणि ग्रामीण भागात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT