Fruit Crop Insurance: रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, या दिवशी मिळणार फळ पिक विम्याचे पैसे

Dhananjay Munde: पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह 3 जानेवारीपूर्वी आदा करावेत असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
Dhananjay Munde On Fruit Crop Insurance
Dhananjay Munde On Fruit Crop InsuranceSaam Tv
Published On

Dhananjay Munde On Fruit Crop Insurance:

पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह 3 जानेवारीपूर्वी आदा करावेत असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील 7500 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 3500 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम आदा करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhananjay Munde On Fruit Crop Insurance
Solapur News: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न; परिसरात गोंधळ; नेमकं काय घडलं?

मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2940 शेतकऱ्यांची 9 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही. याविरोधात तळा येथील शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. (Latest Marathi News)

त्यासंदर्भात खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत आज मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम. एस. सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत राऊत व नामदेव साळवी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Dhananjay Munde On Fruit Crop Insurance
Dhule LCB Action : सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त; धुळे एलसीबीची कारवाई

यावेळी सुनील तटकरे तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोकणातील इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात फळपिक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढील हंगामात हप्त्याची रक्कम सर्वत्र समान करण्याची सूचना कृषी आयुक्तांना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com