Santosh Deshmukh Saam Tv News
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: बीड हत्या प्रकरणाने वातावरण तापलं; अंजली दमानियांच्या खळबळजनक ट्विटनंतर पोलिसांनी दिली महत्वाची माहिती, वाचा सविस्तर

Anjali Damania on Beed Case: संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडल्याची माहिती देणारा व्यक्ती होता दारूच्या नशेत. अंजली दमानियांच्या खळबळजनक ट्विटनंतर पोलिसांनी दिली महत्वाची माहिती.

Bhagyashree Kamble

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय. सरकारमधील काही नेते आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यावी. तसंच संतोष कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी करत सर्वपक्षीय नेत्यांनी मुक मोर्चा काढला. अशातच संतोष देशमुख प्रकरणी फरार आरोपींचा मृत्यू झाल्याची माहिती एका व्यक्तीनं अंजली दमानीया यांना दिली होती. मात्र, अंजली दमानिया यांना ज्या व्यक्तीनं माहिती दिली, तो व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडले असून त्यांचा खून करण्यात आला, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केला होता. त्यांना एका व्यक्तीचा फोन आला होता. त्यात त्या व्यक्तीनं संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा मृतदेह कर्नाटक बॉर्डर रोडवर सापडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी व्यक्तीसोबत झालेल्या संवादाचा कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना पाठवले होते.

पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, दमानिया यांना ज्या व्यक्तीनं ही माहिती दिली, ती व्यक्ती दारूच्या नशेमध्ये होती. हे पोलीस तपासातून समोर आलं आहे. या घटनेविषयी कोणतीही माहिती कोणाकडे असल्यास, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यास किंवा पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी दिले आहे.

वाल्मीक कराड यांच्या पत्नीची दुसर्‍यांदा सीआयडीकडून चौकशी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांची सीआयडीकडून दुसर्‍यांदा चौकशी करण्यात आलीय. बीडच्या केज पोलीस ठाण्यात सीआयडीकडून ही चौकशी करण्यात आलीय. सीआयडीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाण्यातच मंजली कराड यांची एक तास चौकशी केलीय. केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

SCROLL FOR NEXT