Jogendra Kawade Saam Tv
महाराष्ट्र

Jogendra Kawade: आघाडीत आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही दुसऱ्या मित्र पक्षाशी युती करु - जोगेंद्र कवाडे

अडीच वर्षात आघाडीतील पक्षांना न्याय दिला नाही, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: महाविकास आघाडीत मित्र पक्षांना डावलून कामकाज होत आहे. गेल्या अडीच वर्षात आघाडीतील पक्षांना न्याय दिला नाही, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. महाविकास आघाडीत मित्र पक्षांना सन्मान देण्याचा प्रामाणिकपणा पाळला जात नाही. महामंडळ, छोट्या मोठ्या संस्थांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना संधी देत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी याद्या घेतल्या मात्र पुढे काहीच झाले नाही, असंही त्यांनी सांगितलं (Peoples Republican Party President Jogendra Kawade Says Mahavikas Aghadi Attitude Towards Other Alliance Is Not Good).

आघाडीच्या नेत्यांनी प्रामाणिक पणाला काळिमा फासला आहे. त्यामुळे आघाडीत आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही दुसऱ्या मित्र पक्षाशी युती करू, असा इशारा जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा चित्रपट आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. राष्ट्रवादीत येण्यापूर्वी कोल्हे हे पहिले आरएसएसमध्ये होते. हे शरद पवारांना (Sharad Pawar) माहीत नाही का? त्यांनी कोल्हे यांना प्रवेश कसा दिला. ठाकरे सरकारने कोल्हे यांच्या चित्रपटावर बंदी घालावी, अन्यथा आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असेही कवाडे म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT