Sharad Pawar : 'शरद पवारांमुळे महाविकास आघाडी सरकार जोरात सुरू आहे'

'एक वेळ कोस्टलरोड झाला नाही तरी चालेल पण मुलांना, महीलांना पैसे दिले पाहीजे यासाठी मी भांडते असते.'
Sharad Pawar : 'शरद पवारांमुळे महाविकास आघाडी सरकार जोरात सुरू आहे'
Sharad Pawar : 'शरद पवारांमुळे महाविकास आघाडी सरकार जोरात सुरू आहे'Saam TV
Published On

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) आहेत म्हणुन महाविकास आघाडीचे सरकार जोरात सुरू आहे असं वक्तव्य महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलं आहे त्या आज राज्य महिला आयोगाचा (State Women's Commission) आज 29 वा यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये वर्धापनदिन सोहळा पार पडत आहे त्यावेळी बोलत होत्या. 'शरद पवार आहेत म्हणुन महाविकास आघाडीचे सरकार जोरात सुरू आहे. तुम्हाला जर कोणी आरे म्हटलं तर तुम्ही कारे म्हणण्याची भूमिका महीलांनी घेतली पाहीजे. जगाकडे पाठ केली तर जग तुमच्या पाठीशी असेल.' असा महिलांना विश्वासही यशोमती ठाकूर यांनी दिला.

कोस्टलरोड झाला नाही तरी चालेल पण...

महाविकास आघाडी काळात अजून प्रोॲक्टीव करू शकतो. महीला धोरणाची अंमलबजावणी झाली पाहीजे. 25 किमी वर टॉयलेट हवी आहेत. अशी टॉयलेट कर्नाटकमध्ये (Karnatak) आहेत तर आपल्याकडे का नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. तसंच आपण महिला धोरणाला आपण महत्व देत नाही, तिकडे महत्व दिले पाहीजे, एक वेळ कोस्टलरोड झाला नाही तरी चालेल पण मुलांना, महीलांना पैसे दिले पाहीजे यासाठी मी भांडते असंही त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान राज्य महिला आयोगाचा आज 29 वा यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये वर्धापनदिन सोहळ्यास राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होत्या.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com