Nagpur: कोरोनामुळं मृत्यु झालेल्या नातेवाईकांची मदतीच्या नावावर लूट  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: कोरोनामुळं मृत्यु झालेल्या नातेवाईकांची मदतीच्या नावावर लूट

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - कोरोनामुळं मृत्यु झालेल्या नातेवाईकांची मदतीच्या नावावर लूट होत असल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलं आहे. राज्य शासनाच्या 50 हजार रुपयांच्या मदतीसाठी दलाली घेतली जात असून यासाठी अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे.

कोरोनामुळं मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही मदत मिळविण्यासाठी कोविड मुळं निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी राज्य शासनानं विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीच्या सिएससीएसपीव्ही मधून अर्ज करू शकतो.

हे देखील पहा -

अद्याप ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू व्हायची आहे. मात्र, काहींनी ही मदती मिळवून देण्यासाठी दलाली करणं सुरू केलं आहे. त्यासाठी काहींनी तर चक्क 'कोविड 19 मुआवजा केंद्र' दुकान थाटल आहे. शासनाकडून 50 हजार रुपये जमा झाल्यावर सात दिवसांच्या आत आम्हाला 5 हजार द्यावेत, असं सांगितलं जात आहे. आश्चर्य म्हणजे त्यांच्यापासून तसं हमीपत्र लिहून घेतलं जात आहे. मात्र, हा धक्कादायक प्रकार असून अशा लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

अनेकांना संगणक, इंटरनेट आणि सरकारी किचकट प्रक्रिया माहीत नसते. असे लोक या दलालांच्या जाळ्यात फसतात. मात्र, आधीच करोना मुळं त्यांनी घरातला व्यक्ती गमावला असतो. अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष गेलाय. ते आधीच मानसिक धक्क्यात आहेत, आर्थिक अडचणीत आहेत. अशांना मदत करण्याऐवजी त्यांची आर्थिक लूट केली जात असेल तर हे नक्कीच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT