Ajit Pawar , Satara, Patan, Thane , Madan Kadam
Ajit Pawar , Satara, Patan, Thane , Madan Kadam saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : भांडणं झाली... रिव्हाॅलवर काढले... गोळीबार केला... काय मोगलाई लागून गेली आहे का ? अजित पवारांनी सरकारलं फटकारलं (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

Maharashtra Assembly Session 2023 : सातारा जिल्ह्यातील पाटण (Patan) तालुक्यातील गुरेघर (gureghar) येथे रविवारी झालेल्या गोळीबारच्या घटनेचे पडसाद आज (साेमवार) विधानसभेत उमटले. राज्याचे विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. त्याची चाैकशी करावी अशी मागणी सभागृहात केली. (Ajit Pawar Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले ही घटना दुर्देवी आहे. भांडण झाली म्हणून गाेळीबार सारखा गंभीर प्रकार घडला. या घटनेत दोन जण ठार झाले आहेत. एक जण गंभीर जखमी (injured) आहे. त्याची प्रकृती देखील अत्यवस्थ आहे. या प्रकरणी पाेलिसांनी मदन कदम (Madan Kadam) यास अटक केली आहे. (Breaking Marathi News)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे आहेत. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांचा जवळचा कार्यकर्ता देखील मृत्यूमुखी पडला. माेरणा खाे-यात भितीचे वातावरण पसरलं आहे.

काय मोगलाई लागून गेली आहे का ? अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला फटकारलं. अजित पवार म्हणाले या घटने प्रकरणी तिघांना अटक झाली आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची चाैकशी झाली पाहिजे. सरकाराने चाैकशी करुन सभागृहात निवेदन झाले पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यावर संबंधित माहितीची दखल घेऊन त्वरीत याेग्य ती उपाययाेजना करावी असे सभापतींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT