Sangli News: जत शहरातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विजय ताड (bjp former corporator vijay tad) यांच्या खून प्रकरणी चाैघांना अटक करण्यात पाेलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एकाचा शाेध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली (sp basavraj teli) यांनी दिली. (Breaking Marathi News)
भरदिवसा खून
भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांची शुक्रवारी गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघालेल्या ताड यांच्यावर सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल जवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यावेळी पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला होता.
चार पथकांची नियुक्ती
ही घटना कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. यापप्रकरणी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता. यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती.
या प्रकरणातील चाैघांना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. पाेलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिलेल्या माहितीनूसार बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने, आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण या चाैघा संशयिताना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार हा माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान भाजपच्या माजी नगरसेवक उमेश सावंत याचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.