passenger stabbed by ticketless youth reserved coach Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Wardha News update : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद झाला. एक्स्प्रेसमधील तरुणाने प्रवाशाला ब्लेडने सपासप वार केले.

Saam Tv

चेतन व्यास, साम टीव्ही

गुन्हेगारी प्रवृतीच्या असलेल्या युवकाने विना तिकीट रेल्वेत चढत आरक्षित डब्यात जागेवरून प्रवाश्यासोबत वाद घातला. वाद घालत थेट प्रवाश्याच्या मानेवर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना धामणगाव ते पुलगाव दरम्यान हावडा अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी वर्धा रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

अहमदाबाद येथून हावडा येथे जाणारी 12833 अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसमध्ये दुपारी 4 वाजता दरम्यान धामणगाव येथून हावडाच्या दिशेने सुटली. दरम्यान धामणगाव रेल्वे स्थानकावर आशिष मिसाळ हा युवक एस 1 या डब्यात चढला. आशिषकडे कोणतेही रेल्वे प्रवासाचे तिकीट नव्हते दरम्यान तो एस 1 या डब्यातील 48 क्रमांकाच्या सीटवर बसण्यासाठी तेथील आरक्षित असलेले प्रवासी नरेशकुमार ठाकुराम वर्मा यांच्याशी वाद घालू लागला. आशिषने नरेशकुमारला सीटवर बसण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर धमकी देत लाथा-बुक्यानी मारहाण केली.

आशिष एवढ्यावरच न थांबता त्याने नरेशकुमारच्या मानेवर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना डब्यातील इतर प्रवाशांसमोर घडली. याची माहिती तातडीने रेल्वे पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी जखमी आणि आरोपीला रेल्वे स्टेशन वर्धा येथे उतरवून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. जखमीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीविरुद्ध कलम 115(2),118(1),352,351(2)बीएनएस सहकलम 137 रेल्वे अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.आरोपी हा गुन्हेगारी प्रवृतीचा असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

घटना ही धामणगाव ते पुलगाव रेल्वे स्थानक दरम्यान प्रवासात घडल्याने वर्धा रेल्वे पोलिसांनी प्रकरण दाखल करत बडनेरा रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे. रेल्वेत घडलेल्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली असून रेल्वे प्रवाश्यांचा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : घराच्या बाहेर निघताच बिबट्याची झडप; जीव वाचविण्यासाठी केले दोन हात

मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये मनसे नेत्याची दादागिरी; डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण; राड्याचा VIDEO व्हायरल

Mumbai News: भररस्त्यात तरुणाकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, मुंबईमधील भयंकर घटना; VIDEO पाहून नागरिक संतापले

Maharashtra Live News Update: कर्जबाजारीपणातून तरुणाची आत्महत्या; पेट्रोल ओतून घेतला जीव

Railway Exam Rules: रेल्वे परीक्षेच्या नियमात मोठा बदल; पेपरवेळी परीक्षार्थींना 'या' गोष्टीची असणार मुभा

SCROLL FOR NEXT