HSC Exam, Nanded, HSC, Copy, Students, Parents saam tv
महाराष्ट्र

HSC Exam 2023 : महाराष्ट्राची काॅपी जत्रा... बारावीच्या विद्यार्थ्यांना 'या' परीक्षा केंद्रावर काॅपीचे झाले वाटप (पाहा व्हिडिओ)

राज्यात बारावीच्या पहिल्याच पेपरला अनेक ठिकाणी काॅपी केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई झाली.

संतोष जोशी

Nanded : राज्यात इयत्ता बारावीची परीक्षा (HSC Exam 2023) काॅपी मुक्त व्हावी यासाठी शिक्षण महामंडळासह प्रशासन सज्ज झाले असले तरी बहुतांश जिल्ह्यात पेपर फुटी प्रकरण, काॅपी करण्याचे प्रकार घडल्याचे समाेर आले आहे. मंगळवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या (HSC English Subject Paper Leaked) पहिल्याच पेपरला काॅपी बहाद्दर आणि त्यांच्या नातेवाईकांनी नांदेड (Nanded Latest News) जिल्ह्यात धुमाकुळ घातल्याचे सचित्र दर्शन समाज माध्यमातून (Social Media) व्हायरल हाेऊ लागले आहे.

समाज माध्यमातून व्हायरल झालेल्या नांदेड जिल्ह्यातील चिखली येथील परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांची यात्रा भरल्याचे चित्र दिसत आहे. वर्गावरील शिक्षकांचा काॅपी पुरवणाऱ्यांवर वचक दिसत नव्हता. केंद्रावर पोलिसांचा देखील नावालाच बंदाेबस्त हाेता की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चिखली येथील परिक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना काॅपी देतानाचे त्यांच्या नातेवाईकांचे व्हिडीओ आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी गट शिक्षणाधिकाऱ्यांचे बैठे पथक असताना देखील चिखली केंद्रावर काॅप्यांचा बाजार भरला होता. काही वेळेला पाेलिस काॅपी पूरविणा-यांना हटकत हाेते. तर शिक्षक विद्यार्थ्यांकडून काॅपीचा प्रकार हाेऊ नये यासाठी चिठ्ठी गाेळा करत हाेते.

खरं तर काॅपी मुक्तीचा नांदेड पॅटर्न राज्यभर राबविला जाताे. मात्र या प्रकरामुळे आता नांदेड पॅटर्नची वाट लागल्याची चर्चा रंगली आहे. परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपीचे प्रकार घडत असताना काेणाची तक्रारीची वाट शिक्षण मंडळ पाहत आहे असा प्रश्न निर्माण हाेत आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT