NEET exam  saam tv
महाराष्ट्र

NEET Paper Leak : नीट परीक्षा पास होईल का? या विवंचनेतून १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; महाराष्ट्र हादरला

NEET paper leak latest news Maharashtr : परभणीतील १२ वीच्या विद्यार्थ्याने NEET परीक्षा पास होईल का या भीतीतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य हादरले आहे.

Namdeo Kumbhar

विशाल शिंदे, परभणी प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Class 12 student suicide over NEET stress : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील एका विद्यार्थ्याने 'नीट'च्या (NEET) परीक्षेत पास होईल का? या विवंचनेतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देशात नीट पेपरफुटीनंतर दररोज नवे खुलासे होत असतानाच विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल परभणीमध्ये उपस्थित केला जात आहे.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील रहिवासी विनायक रामधन राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या प्रथमेश राठोड (वय १२ वीत शिकत असलेला) हा नांदेड येथे 'नीट' परीक्षेची तयारी करत होता. चार दिवसांपूर्वीच तो गावाकडे आला होता. बुधवारी रात्री जेवण करून सर्व जण झोपले, तर प्रथमेश अभ्यासासाठी त्याच्या खोलीत गेला. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रथमेश उलट्या करत असल्याचा आवाज त्याच्या आईला आला. आई तातडीने प्रथमेशजवळ गेली असता, तिला विषारी औषधाचा तीव्र वास आला. तिने विचारणा केली असता, प्रथमेशने "मी नीट परीक्षा पास होईल का?" असे बोलून दाखवले.

त्यानंतर नातेवाईकांनी आरडाओरडा करत त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात विनायक राठोड यांच्या तक्रारीवरून, "प्रथमेश याने नीट परीक्षा पास होईल का? या भीतीपोटी विषारी औषध प्राशन केले" अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

NEET प्रकरणात आरोपीचा पतीही रडारवर

NEET Paper Leak | NEET Scam Update : देशभरात गाजणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर येतेय. या प्रकरणात अटकेत असलेल्या एका महिला आरोपीच्या पतीची आता दिल्लीत चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ज्यामध्ये संबंधित महिला आरोपीनं तिच्या पतीच्या मोबाईलचा वापर करून या घोटाळ्यातील इतर मुख्य आरोपींशी संवाद साधला होता. आता तपास यंत्रणा या महिलेच्या पतीला गाठून, इतर आरोपींसोबत नेमकं काय आणि किती वेळा बोलणं झालं, याबाबत कसून चौकशी करणार आहेत. या चौकशीमुळे पेपरफुटीच्या कटातील आणखी काही मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT