AUNT AND TWO NIECES DROWN IN GODAVARI RIVER; HEARTBREAKING TRAGEDY IN PARBHANI 
महाराष्ट्र

Parbhani: पुतणींचा आरडाओरडा ऐकताच काकीनं गोदावरी नदीत घेतली उडी; चुलतीसह २ सख्खा बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू

Godavari River : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदीत बुडून दोन बहिणी आणि त्यांच्या काकूचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या मुलींना वाचवण्यासाठी चुलतीनं पाण्यात उडी घेतली होती, परंतु त्यातच त्यांचाही जीव गेला.

Bharat Jadhav

  • परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीत तिघांचा बुडून मृत्यू.

  • दोन सख्ख्या बहिणी नदीत बुडू लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी चुलतीने उडी घेतली.

  • पोहता न आल्यामुळे चुलतीसह तिन्ही जणींचा मृत्यू झाला.

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या चुलतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोन मुली आपल्या काकूसह गोदावरी नदी पत्रात आंघोळीसाठी गेल्या होत्या. नदीपात्रात पाणी वाहत नसले तरी मात्र पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले आहे. या दोन्ही मुली गोदावरी नदी पात्रात उतरल्या आणि त्या थोड्या दूरपर्यंत गेल्या. तेथे मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

त्या दोघी पाण्यामध्ये बुडू लागल्या. त्यावेळी त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मोठं-मोठ्यानं आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून चुलतीने आपल्या दोन्हीही पुतणींना वाचवण्यासाठी नदीपात्रात गेल्या. पण त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे शेवट तिघींचा देखील पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. पाण्यामध्ये बुडवून मृत्यू पावलेल्या सिंधुताई दतराव जाधव वय 45, उत्कर्षा उत्तम जाधव वय 19 वर्ष, समीक्षा उत्तम जाधव वय 17 वर्ष अशी त्यांची नावे आहेत.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी तिघींचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तिघींचे मृतदेह पुढील तपासणीसाठी सोनपेठ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोहळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पाण्यात बुडून MBA च्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अहिल्यानगरमध्ये खळबळ

अहिल्यानगरमधील चंद्रपूर गावात काही दिवसापूर्वी एमबीएच्या ३ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चंद्रपूर गावातील साठवण तलावात एमबीएचे तीन विद्याथी पोहण्यासाठी गेले होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. स्थानिक त्यांच्या मदतीसाठी धावले पण त्यांना तिघांना वाचवण्यात अपयश आले होते. २४ वर्षीय अभिषेक गंगाधर जाधव, २३ वर्षीय प्रवीण प्रभाकर रसाळ आणि २६ वर्षीय महेश अशोक शिंदे या तीन विद्यार्थ्यांची नावे होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT