Parbhani Saam
महाराष्ट्र

Parbhani: छत्रपती संभाजी महाराजांचं स्टेटट्स ठेवल्यामुळे तरूणाला घेरलं, शर्ट फाडलं, लाथाबुक्क्यांनी तुडवलं, परभणीत खळबळ

SambhajiMaharaj Status Parbhani News: इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराज यांची फोटो स्टोरी ठेवल्यामुळे एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. शर्ट फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी तरूणाला मारहाण करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

विशाल शिंदे, साम टीव्ही

सध्या राज्याचं वातावरण औरंगजेबाच्या कबरीवरून तापलं आहे. अशातच परभणीतील गंगाखेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराज यांची फोटो स्टोरी ठेवल्यामुळे एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. शर्ट फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी तरूणाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

परभणीतील गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीत एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अभिषेक खडवे (वय वर्ष २२) असे तरूणाचे नाव आहे. अभिषेकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो ठेवला होता.

फोटोमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या हातात तलवार आहे. तर, त्यांच्या पायाखाली औरंगजेब दिसत आहे. हा स्टेटस ठेवल्यानंतर अभिषेकला गल्लीत काही लोकांनी घेरलं. ७ ते ८ जणांनी मिळून त्याला अमानूष मारहाण केली.

या मारहाणीत त्याचं शरीर काळं निळं पडलं. शर्ट फाटेपर्यंत त्याला मारलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अभिषेकने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT