Parbhani Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : परभणी जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; ८ लघु प्रकल्प कोरडेठाक

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ५२३ मिलीमीटर इतकाच पाऊस झाले आहे.

राजेश काटकर

परभणी : पाऊस नसल्याने यंदा आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात देखील पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण जिल्ह्यातील (Water Crisis) आठ लघु प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. तर बावीस लघु प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पाचे पाणी ज्योत्याखाली गेले आहे. (Latest Marathi News)

परभणी जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ५२३ मिलीमीटर इतकाच (Rain) पाऊस झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला नाही. जिल्ह्यातील मासोळी प्रकल्पासह ९ लघु प्रकल्प हे ज्योत्याखाली पडले आहे. तर ८ महत्वाचे लघु प्रकल्प हे कोरडेठाक पडले (Water Scarcity) आहे. यामुळे उन्हाळ्याची आगामी दोन महिन्यात पाणी टंचाई जाणविल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण सोडले तर निम्न दुधना प्रकल्प, ढालेगाव बंधारा, मासोळी प्रकल्प, झरी प्रकल्प, करपरा व मुद्गल बंधाऱ्यासह पाझर तलावातील पाणीसाठा तळाला गेल्याने अगामी काळात परभणी कराना पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

Methi Hair Oil Benefits: केसांच्या समस्यासाठी मेथी तेल ठरेल गुणकारी, कोंडा, केसगळती होईल लगेचच कमी

बॅगेत दगड भरून तलावात उडी मारली, कोल्हापुरात डॉक्टरने आयुष्य संपवलं, टोकाचा निर्णय का घेतला?

Womens Health: लहान वाटणाऱ्या समस्या महिलांसाठी ठरू शकतात घातक; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

SCROLL FOR NEXT