Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; पोहण्यासाठी उतरले असता घडली घटना

Parbhani News : परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील शेततळे भागात १८ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडली.

राजेश काटकर

परभणी : शेततळे असलेल्या भागात जनावरे चारण्यासाठी दोन मुले गेली होती. तळ्यातील पाणी पाहून पोहण्याचा मोह (Parbhani) आवरला गेला नाही. पाणी पाहून शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला. (Breaking Marathi News)

सदरची घटना परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील शेततळे भागात १८ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडली. मयत दोन्ही मुले सायाळा खटिंग येथील रहिवाशी आहेत. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. कृष्णा बालासाहेब पौळ (वय १४) व ओम बाबुराव कंधारे (वय १४) असे मयत मुलांची नावे आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुले बुडाल्याची माहिती गावात मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी मुलांचा शोध घेतला. वनामकृवीतील शेततळे भागात कृष्णा पौळ याचा मृतदेह आढळून आला. तर ओम दिसून आला नाही. कृष्णाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. शेततळ्यात ओमचा शोध घेण्यात आला. यानंतर आज ओम कंधारे याचा देखील मृतदेह मिळून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT