Maratha Reservarion Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : बैलगाडीसह जेलभरो आंदोलन; जिंतूरात सकल मराठा समाज आक्रमक

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी बेमुदत बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. मात्र राज्य सरकारकडून वेळकाढूपणा होत असून उपोषणाची दखल घेतली जात नाही.

राजेश काटकर

परभणी : मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा मागणीसाठी सहा दिवसांपासून बेमुदत (Parbhani) उपोषणाला बसले आहेत. राज्य शासनाकडून दाखल घेतली जात नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान (Jintur) जिंतूर येथे बैलगाडीसह जेलभरो आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) बेमुदत बसलेले मनोज जरांगे पाटील यांची (Manoj Jarange Patil) प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. मात्र राज्य सरकारकडून वेळकाढूपणा होत असून उपोषणाची दखल घेतली जात नाही. म्हणून राज्यात सर्वत्र आंदोलनास सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमवून बैलगाडीसह जेलभरो आंदोलन करण्यात आले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी मराठा समाजातील तरुणांनी मनोगतातून राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान पोलिसांनी (Maratha Reservartion) आंदोलनकर्त्याना ताब्यात घेत सोडून देण्यात आले. शिवाय आगामी काळात मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही; तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक, राज्यसभेचा उमेदवार ठरणार?

मोठी बातमी! परीक्षेच्या काही मिनिटांआधी MSc नर्सिंगची परीक्षा रद्द, अचानक नेमकं काय घडलं?

कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी? तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

Akkalkot : अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेलाय? मग न विसरता फिरा 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT