Parbhani Rain Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Rain : सेलू, पाथरी, मानवत तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा

Parbhani News : परभणी जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाची सुरुवात झाली. ह्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार

राजेश काटकर

परभणी : राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले. यात रविवारी रात्री व आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, पाथरी व मानवत तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे बळीराजाला आता दिलासा मिळाला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील काही अंशी सुटणार आहे. 

परभणी (Parbhani) जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाची सुरुवात झाली. ह्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे. तर नागरिकांना उकड्या पासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान सेलू शहरातील तेली गल्ली, शनी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात रोडवर पाणी आल्याने मोठी तारांबळ उडाली. तर नाल्याला मागील अनेक (Rain) पावसाळ्यात पाणी येत घरात जात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस पुन्हा वाढला तर ह्या रोडवरील पाणी घरात जाण्याची शक्यता असल्याने पुन्हा नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.

पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा

परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. मात्र जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पेरणी करण्यायोग्य पावसाची देखील शेतकऱ्यांना (farmer) प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला तरच पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Maharashtra News Live Update: ठाण्यात उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेचा दिग्गज नेता फोडला, ५ नगरसेवक अन् २०० पदाधिकाऱ्यांसह हाती घेतलं कमळ

Skin Glow Drink : फक्त ७ दिवसांत ब्रायडल ग्लो हवाय? 'हे' सोपे अन् जादुई ड्रिंक पिऊन तर पाहा

Ladki Bahin Yojana : पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होणार? सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT