Shaktipeeth Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Mahamarg : शेतकऱ्यांचा जमिन मोजणीला विरोध; शक्तीपीठ महामार्गाची भूसंपादन होऊ न देण्यावर शेतकऱ्यांचा निर्णय

Parbhani News : नागपूर ते गोवा असा नव्याने शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. याबाबत मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत

Rajesh Sonwane

विशाल शिंदे 

परभणी : नव्याने होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा राज्यभरातून विरोध होत आहे. हा विरोध कायम असून या अनुषंगाने परभणीतील शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्गाच्या महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यात शक्तीपीठ महामार्गाची जमिनीची मोजणी आणि भूसंपादन होऊ न देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून या निर्णयावर शेतकरी ठाम राहणार आहेत. 

नागपूर ते गोवा असा नव्याने शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. याबाबत मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यानुसार मोजणीसाठी सुरवात करण्यात आली असून याला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांकडून अडवणूक केली जात आहे. 

जिल्ह्यातील ३१ गावातील शेतकरी एकत्र  
परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक श्री क्षेत्र पोखरणी नरसिंह येथे पार पडली. या बैठकीला बाधित ३१ गावातील प्रत्येकी २ शेतकरी उपस्थित होते. यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची मोजणी आणि भूसंपादन करू दिले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी न देण्यावर शेतकरी ठाम आहेत. 

एक इंच जागाही देणार नाही  

तसेच वेळ पडली तर टप्प्याटप्प्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको, जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णयही या शेतकऱ्यांनी घेतला आहे. सरकारने जमीन घेण्याअगोदर आमचा जीव घ्यावा; अशी भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही एक इंच जागाही शक्तिपीठ महामार्गासाठी देणार नसल्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी बैठकीत घेतला. त्यामुळे सरकार आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT